औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार असून, जनतेचा पक्षावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. उमेदवार निवडीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतींना झालेल्या प्रचंड गर्दीतून हा विश्वास स्पष्टपणे दिसून आला आहे.

निवडणूक प्रचार, जबाबदाऱ्या आणि आगामी रणनीती यासंदर्भात नवनियुक्त प्रभाग समन्वयक व निरीक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक कांती चौक येथील पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेऊन प्रभागनिहाय नियोजन, संघटन बळकटीकरण आणि जनतेपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, पूर्व जिल्हा निरीक्षक प्रभाकर बकले, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष ॲड. रामेश्वर तायडे, औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व शहर अध्यक्ष मतीन पटेल, युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा आघाडी पूर्व शहराध्यक्ष अफसर पठाण यांच्यासह 29 प्रभाग निरीक्षक उपस्थित होते.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागात प्रभावी प्रचार करून वंचित बहुजन आघाडीचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.






