मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी संन्यस्त खड्ग’ या नाटकावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या नाटकात तथागत गौतम बुद्ध यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप चेतन अहिरे यांनी केला आहे.
चेतन अहिरे यांनी या नाटकाच्या आयोजकांना आवाहन केले आहे की, द्वेष पसरवणारे हे नाटक त्वरित बंद करावे. अन्यथा, मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. जर हे नाटक बंद केले नाही, तर मुंबईतील बौद्ध बांधवांच्यावतीने या नाटकाचे प्रयोग उधळून लावले जातील.
त्यांनी विशेषतः आगामी प्रयोगांचा उल्लेख केला आहे. २० तारखेला (रविवार, २१ जुलै २०२५) प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे आणि २५ तारखेला (शुक्रवार, २६ जुलै २०२५) विलेपार्ले येथे होणारे प्रयोग रद्द करण्याची मागणी अहिरे यांनी केली आहे. अहिरे यांनी असेही म्हटले आहे की, जर जाणीवपूर्वक हे नाटक प्रदर्शित केले जात असेल, तर बौद्ध बांधवांच्यावतीने ते बंद केले जाईल. सावरकर लिखित संन्यस्त खड्ग’ हे नाटक रद्द करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी पुण्यात वंचित बहुजन आघाडीने या नाटकाचा प्रयोग बंद केला होता.
संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी
अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील इंदिरा नगर येथील पल्लवी सागर गंगावणे यांच्यावर झालेल्या विनयभंग, मारहाण, चोरी आणि बदनामीच्या प्रकरणात संबंधित आरोपींवर...
Read moreDetails