मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. योजनेची अंमलबजावणी त्वरित न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला आहे.
महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना मसाला कांडप मशीन, सिलाई मशीन, आणि घरघंटी यांसारख्या वस्तूंचे वाटप करण्याचे आदेश डिसेंबर २०२४ मध्येच देण्यात आले होते. मात्र अनेक महिने उलटूनही अद्याप या वस्तूंचे वितरण झालेले नाही. परिणामी, हजारो महिलांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील राजेंद्र जवळगेकर यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी महापालिका आयुक्त कार्यालयात एक अधिकृत निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी प्रशासनावर तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे. त्यांनी प्रामुख्याने खालील मागण्या मांडल्या आहेत:
– पात्र महिलांना वस्तूंचे तात्काळ वाटप सुरू करावे.
– वाटप प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय व्हावी.
– वस्तूंचे वाटप कोणत्याही राजकीय नेत्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या हस्ते न होता, फक्त महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फतच व्हावे.
– वस्तूंचे वाटप मुंबई महानगरपालिकेच्या जागेतच करण्यात यावे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यास किंवा वाटपामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यास, वंचित बहुजन आघाडी याच प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे जवळगेकर यांनी स्पष्ट केले. महिलांना त्यांचा हक्क मिळायलाच हवा. योजनेचे सामान गोदामात पडून आहे आणि महिलांना काहीच मिळाले नाही, हे प्रशासनाचे अपयश आहे. तात्काळ वाटप न झाल्यास आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...
Read moreDetails