Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीचा एनएचएम आंदोलनाला पाठिंबा!

mosami kewat by mosami kewat
August 25, 2025
in बातमी
0
हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीचा एनएचएम आंदोलनाला पाठिंबा!
       

हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा, हिंगोलीने निशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेपुढे आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024 ची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. सदर जीआरनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ज्योतिपाल रणवीर, युवक जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे, युवक जिल्हा संघटक निखिल कवाने, युवा नेते अक्षय इंगोले, माथाडी कामगार प्रभारी राजरत्न बगाटे, जिल्हा सहसचिव लखन खंदारे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी शासनाने तातडीने मागण्या मान्य करून जीआरची अंमलबजावणी न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.


       
Tags: HealthHingoliMaharashtravbaforindia
Previous Post

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न!

Next Post

रील शूट करताना मोठी दुर्घटना; ओडिशातील तरुण यूट्यूबर धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेला‎

Next Post
रील शूट करताना मोठी दुर्घटना; ओडिशातील तरुण यूट्यूबर धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेला‎

रील शूट करताना मोठी दुर्घटना; ओडिशातील तरुण यूट्यूबर धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेला‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका
बातमी

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; ‘या’ जिल्ह्यांना पुराचा फटका

by mosami kewat
September 16, 2025
0

Maharashtra Monsoon : मुंबई, पुणे, आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्यात मुसळधार पाऊसाने झोडपून काढले आहे....

Read moreDetails
मोदी "द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!" ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मोदी “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

September 16, 2025
बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

September 16, 2025
पुण्यात फेलोशिप जाहिरातीबाबत विद्यार्थ्यांचे निषेध आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

पुण्यात फेलोशिप जाहिरातीबाबत विद्यार्थ्यांचे निषेध आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

September 16, 2025
वंचित बहुजन आघाडीचे गोविंद सुर्वे यांचे निधन; सुजात आंबेडकर यांची कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

वंचित बहुजन आघाडीचे गोविंद सुर्वे यांचे निधन; सुजात आंबेडकर यांची कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

September 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home