पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र. 33 जगताप पाटील नगर येथील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्येवर तोडगा निघाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत महापालिकेच्या वतीने ड्रेनेज लाईनमधील गाळ काढून जेट मशीनद्वारे संपूर्ण लाईन साफसफाई करण्यात आली.
येत्या दोन दिवसांत परिसरातील कचरा व पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याचे महापालिकेकडून आश्वासन देण्यात आले आहे. तत्पर सेवा व समस्येचे निराकरण करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिक यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या यशस्वी पाठपुराव्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी खडकवासला विधानसभा अध्यक्ष राजेंद्र कांबळे आणि महासचिव गौतम तायडे यांचे विशेष योगदान राहिले.