Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्यात मोठा आयकर रिटर्न घोटाळा: हजारो कर्मचारी आयकर विभागाच्या रडारवर

mosami kewat by mosami kewat
September 11, 2025
in बातमी
0
पुण्यात मोठा आयकर रिटर्न घोटाळा: हजारो कर्मचारी आयकर विभागाच्या रडारवर
       
‎‎‎पुणे : पुण्यामध्ये आयकर परतावा घोटाळा उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा घोटाळा सुमारे ५०० कोटी रुपयांचा असून, यात अनेक खासगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हजारो कर्मचारी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. याप्रकरणी आयकर विभाग संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे.‎‎

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आयकर रिटर्न भरण्याचे काम करणाऱ्या एका टोळीने हा मोठा घोटाळा केला आहे. या टोळीने अनेक नोकरदारांना त्यांच्या उत्पन्नावर जास्तीत जास्त कर परतावा (Tax Refund) मिळवून देण्याचे आमिष दाखवले. गेल्या ५ वर्षांपासून ही टोळी पुण्यात सक्रिय होती. त्यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांचे आयकर रिटर्न भरले आहेत. यात बहुतांश खासगी आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणारे पगारदार कर्मचारी आहेत.

‎‎या रॅकेटने कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही कागदपत्रांशिवाय, केवळ बोगस दावे दाखवून रिटर्न भरले. यामध्ये गृहकर्जाचे व्याज आणि मुद्दल परतफेड, वैद्यकीय खर्च, विमा प्रीमियम, शैक्षणिक कर्ज, आणि घरभाडे भत्ता (HRA) यांसारख्या बाबींमध्ये चुकीची माहिती भरून क्लेम वाढवले होते.

‎‎आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, हे एक संघटित रॅकेट होतं, ज्याने जुन्या फाइलिंग सिस्टीममधील त्रुटींचा फायदा घेतला. मात्र, आता नवीन सिस्टीममध्ये या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवरही आयकर विभाग कारवाई करणार आहे. त्यामुळे, कर परताव्याच्या या फसवणुकीत अडकलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Tags: fraudIncome taxpunePune vbaforindia
Previous Post

वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला यश : पुण्यातील प्रभाग क्र. 33 मध्ये ड्रेनेज लाईन स्वच्छ

Next Post

Pune Crime : पुत्रप्राप्तीच्या नावाखाली महिलेची तीन लाखांची फसवणूक; पुण्यातील भोंदूबाबास अटक

Next Post
Pune Crime : पुत्रप्राप्तीच्या नावाखाली महिलेची तीन लाखांची फसवणूक; पुण्यातील भोंदूबाबास अटक

Pune Crime : पुत्रप्राप्तीच्या नावाखाली महिलेची तीन लाखांची फसवणूक; पुण्यातील भोंदूबाबास अटक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे तिथे गुन्हे : जुन्या वादातून रिक्षाचालकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, तिन्ही आरोपी ताब्यात
Uncategorized

पुणे तिथे गुन्हे : जुन्या वादातून रिक्षाचालकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, तिन्ही आरोपी ताब्यात

by Akash Shelar
May 19, 2026
0

पुणे : शहरात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे काढणारी एक धक्कादायक घटना कात्रज परिसरात समोर आली आहे. कात्रज चौक ते...

Read moreDetails
गुणवत्तेचा खून करणारे कोण : आरक्षणवादी की भ्रष्ट दलाल?

गुणवत्तेचा खून करणारे कोण : आरक्षणवादी की भ्रष्ट दलाल?

May 19, 2026
बौद्ध समाजाची जात नोंदणी: वैचारिक पराभव की संवैधानिक अपरिहार्यता?

बौद्ध समाजाची जात नोंदणी: वैचारिक पराभव की संवैधानिक अपरिहार्यता?

May 19, 2026
RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !

RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !

May 18, 2026
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत

May 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home