मुंबई -वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजी वरळी, मुंबई येथे पार पडली. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना प्रंचंड प्रतिसाद मिळतोय. त्या पार्श्वभूमीवर ह्या बैठकीला महत्त्व होते.
ही बैठक आगामी काळातील लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक झाली. यात महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा बैठक होणार आहे.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे कोअर कमिटीतील नेते उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व होते. या बैठकीत आगामी रणनीती व लोकसभा निवडणुकीचा ब्रॉड रोड मॅप या विषयी चर्चा झाली, निवडणुकीच्या रणनीतीवर दिवसभर चर्चा झाली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यावेळी बोलतांना म्हणाले की, राज्याचे राजकारण गढूळ होतांना वंचित बहुजन आघाडीचे महत्त्व आणि ताकद वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख लोकांची ही बैठक महत्त्वपूर्ण आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व होते. राज्यात सर्व विरोधी पक्षांना वाटतंय की, वंचित बहुजन आघाडी सोबत असली पाहिजे पण, अजून तरी त्यावर कोणी पाऊल उचललं नाहीये. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख राज्य पदाधिकारी यांच्यासह युवा नेते, सुजात आंबेडकर देखील उपस्थित होते.