नागपूर : वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हा तर्फे रविभवन विश्रामगृह येथे नवनियुक्त तालुका व शहर पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्य कार्यकारणी सदस्य व जिल्हा प्रभारी कुशलभाऊ मेश्राम यांनी भूषविले, तर प्रा. अनिकेत मून यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष अजय सहारे, ऍड. दिनेश तायडे, महासचिव सी.सी. वासे, पंकज शेलारे, राजेश ढोके, उपाध्यक्ष प्रिन्स श्यामकुळे, सचिव सोनिया वानखेडे, सहसचिव भास्कर पाटील, सदस्य शेषराव मेश्राम व देवराव भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवनियुक्त तालुका व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी – तालुकाध्यक्ष जगदीश रंगारी, सचिन मडके, अमन जामगडे, अमोल डोंगरवार, कार्याध्यक्ष नागेश बोरकर, संजय गोंडुळे, शहराध्यक्ष सुशील ब्रह्मरक्षे, विशाल सोनवणे, नयन जामगडे, नितेश मेश्राम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची पूर्वतयारी, जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला.यावेळी नव्या कार्यकारिणीत युवा वर्गाला मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच “गाव तिथे शाखा” अभियान जिल्ह्यात राबविण्याबाबत चर्चाही झाली.
बैठकीच्या अखेरीस वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला. या प्रसंगी जिल्हा, तालुका व शहरातील कार्यकर्ते विनायक घुमटकर, विदेश डोंगरे, महेंद्र बागडे, वैभव येवले, शुभम वाहने, लक्ष्मण बागडे, आनंद ठाकूर, सरजू इंगळे, मयुर फुलझले, विक्की गजभिये, रामकृष्ण दहिवले, सदानंद शेंडे, रितिक गजभिये, चंदन गोडबोले, अमर खोब्रागडे, शुभम रंगारी, पीयूष दहिवले, प्रदीप काळे, नीलकमल बोरकर, महेश साखरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.