Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

वंचित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुका लढवणार; धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

mosami kewat by mosami kewat
August 17, 2025
in Uncategorized, बातमी
0
वंचित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुका लढवणार; धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

वंचित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुका लढवणार; धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

धाराशिव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार तुळजापूर येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातील वंचित, शोषित आणि पीडित समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष सातत्याने काम करत असून, याच प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. भर पावसातही शेकडो कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित होते.
‎
‎तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या धाराशिव जिल्हा पक्ष संघटनेची आढावा बैठक पार पडली. पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि संभाव्य नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि ताकदीचा आढावा घेण्यात आला.
‎
‎या बैठकीला जिल्हा प्रभारी ॲड. रमेश गायकवाड, युवक आघाडी जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष ॲड. प्रणित डिकले, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्धार करण्यात आला. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ज्यात जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. गायकवाड, नासिर शेख, रविकिरण बनसोडे, रुस्तमखा पठाण,
‎
‎जिल्हा संघटक विकास बनसोडे, परमेश्वर लोखंडे, प्रवक्ता ॲड. के. टी. गायकवाड, शिवाजी कांबळे, उमेश कांबळे, अमोल शेळके, सुधीर वाघमारे, गोविंद भंडारे, जीवन कदम, विनायक दुपारगुडे, माजी जिल्हाध्यक्ष बी. डी. शिंदे, मिलिंद रोकडे, रामभाऊ गायकवाड, उमाजी गायकवाड, आम्रपाली गोतसुर्वे, पंकज सोनकांबळे, नितीन सीतापुरे आणि सहदेव कांबळे यांचा समावेश होता, ते सातत्याने पाऊस सुरू असतानाही बैठकीला उपस्थित राहिले.
‎

Tags: Electionsvbaforindiaधाराशिव
Previous Post

सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

Next Post

Solapur : चांदणी नदीला पूर, वाहतूक ठप्प; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची धडपड

Next Post
Solapur : चांदणी नदीला पूर, वाहतूक ठप्प; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची धडपड

Solapur : चांदणी नदीला पूर, वाहतूक ठप्प; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची धडपड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर
बातमी

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 14, 2025
0

हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी...

Read moreDetails
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

November 14, 2025
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

November 14, 2025
राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

November 14, 2025
सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

November 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home