Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा! परभणीत ‘वंचित’ आक्रमक, फोटोला मारले जोडे

mosami kewat by mosami kewat
January 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा! परभणीत ‘वंचित’ आक्रमक, फोटोला मारले जोडे
       

परभणी : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत असून, आज महाराष्ट्रभर गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार आंदोलने, निदर्शने तसेच ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

फुले–शाहू–आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, अन्याय व दडपशाहीविरोधात आपला तीव्र निषेध नोंदवत आहेत. (Vanchit bahujan aghadi)

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात सापडले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, परभणीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाजन यांच्या फोटोला जोडे मारून जोरदार निषेध करण्यात आला. “गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना संबोधित केले. मात्र, या संपूर्ण भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. ही बाब समोर येताच संविधानप्रेमी, दलित संघटना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात गिरीश महाजन यांचा नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Vanchit bahujan aghadi)

आज परभणी येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारले.

राज्यघटनेमुळे मिळालेल्या पदावर बसून घटनेच्या शिल्पकाराचे नाव विसरणे हा जाणीवपूर्वक केलेला अवमान असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला. अशा मानसिकतेच्या मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे सरकारने त्यांची हकालपट्टी करावी. तसेच गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची माफी मागावी.  अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात येत आहे. (Vanchit bahujan aghadi)

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे परभणी उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही,” असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


       
Tags: bjpConstitutionDr Babasaheb AmbedkarGirish MahajanMaharashtraPoliticalREPUBLIC DAYrssVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक; पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

Next Post
महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात 
बातमी

वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात 

by mosami kewat
February 16, 2026
0

वसई : वसई येथील रिक्षा चालकांच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी 'वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा...

Read moreDetails
मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

February 16, 2026
पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

February 16, 2026
उत्तरप्रदेशात १८ जिल्ह्यांतील न्यायालयांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी

उत्तरप्रदेशात १८ जिल्ह्यांतील न्यायालयांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी

February 16, 2026
टिपू सुलतान म्हैसूरचा वाघ की राजकारणाचा बळी ?

टिपू सुलतान म्हैसूरचा वाघ की राजकारणाचा बळी ?

February 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home