मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा एन रुपाली चाकणकर यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात केलेल्या “असंवेदनशील, स्त्रीविरोधी आणि अन्यायकारक” विधानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने (VBA) गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.
हा निषेध मोर्चा मंत्रालयासमोरील ‘ए-४, राजगड, मॅडम कामा रोड’ येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या तथा राज्य महिला आयोग माजी सदस्य उत्कर्षा रूपवते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.





