भंडारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जिल्हास्तरीय बैठक घेऊन निवडणूक तयारीला वेग दिला. या बैठकीत संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे व निवडणुकीसाठी सज्जता दाखवणे हा मुख्य उद्देश होता. (vanchit bahujan aghadi)
बैठकीचे अध्यक्षस्थान महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, माजी जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे, डी. जी. रंगारी, यादराव गणवीर, चरण मेश्राम, अजय रामटेके व महादेव सुखदेवे उपस्थित होते.
या प्रसंगी आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांचे बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा झाली. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
त्यामध्ये प्रतिमा खोब्रागडे, गीता चव्हाण, मंदा मडावी, जोशना खोब्रागडे, स्नेहा रामटेके, रेश्मा शिंदे, सविता वालदे, दामोदर वैद्य आदींचा समावेश होता. त्यांचे पक्षात प्रवेश स्वागत दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. बैठकीत वंचित बहुजन आघाडी सभासद मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कुंदा उके, गीता चव्हाण, अजय रामटेके, रवी बागडे, आनंदराव लोखंडे, पुरंदर वैद्य, बादशहा मेश्राम, संतोष लांडगे, महादेव सुखदेवे, खुशाल सिंहगडे, पुरुषोत्तम वाघमारे आदींनी सक्रिय सहभाग घेतला. (vanchit bahujan aghadi)
बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यामध्ये तनुजा नागदेवे, धनपाल गडपायले, महादेव सुखदेवे, डी. जी. रंगारी, अजय रामटेके, यादवराव गणवीर, चरण मेश्राम, दिलीप वानखेडे, कुंदा उके, प्रतिमा खोब्रागडे, स्नेहा रामटेके, मंदा मडावी, शीला मडामे, शोभा घडले, ज्योती घरडे, जोशना खोब्रागडे, आम्रपाली मोटघरे, सविता वालदे, रेश्मा शेडे, अमित नागदेवे, जगदीश रंगारी, गणेश गजभिये,
वैभव मोटघरे, प्रतिक मोटघरे, भीमराव शेंडे, व्यंकटराव बागडे, राहुल गजभिये, सदानंद रंगारी, अशोक तिरपुडे, आनंदराव लोखंडे, पुरुषोत्तम वाघमारे, खुशाल शिंहगडे, नितेश डोंगरे, बादशहा मेश्राम, पुरंदर वैद्य, केवळ राम उके, शिवप्रसाद मेश्राम, दामोदर वैद्य, देविदास गेडाम, गौतम मेश्राम,
विजय सुखदेवे, मोदकराज रामटेके, खुशाल बोरकर, शंकर मेश्राम, संतोष लांडगे, रविकिरण बागडे, प्रेमचंद खोब्रागडे आदींसह अनेक मान्यवरांचा सहभाग होता. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक लढविण्याबाबत उत्साह वाढला असून वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भक्कम तयारी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails