पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवनियुक्त कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या नवनियुक्त कार्यकारिणीमधील पदाधिकाऱ्यांचे, तसेच नव नियुक्त शहर अध्यक्ष यांचे महिला आघाडी आणि युवक आघाडी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यकारिणी जाहीर होताच, पदाधिकाऱ्यांनी संविधान सन्मान महासभेची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत संविधान सन्मान महासभेच्या आयोजनावर चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संविधान सन्मान महासभेसाठी हजारोच्या संख्येने जाण्याचा निर्धार केला.






