शेवगाव : राज्यातील सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षच शिल्लक ठेवलेला नाही. सध्या विरोधी बाकावर असलेले पक्ष केवळ देखावा करत आहेत. त्यांना त्यांच्या संस्था वाचवायच्या असल्यामुळे ते सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवत नाहीत, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी व्यक्त केले. म्हणूनच, वंचित बहुजन आघाडीच सत्ताधारी आणि मुजोर प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांसाठी लढत आहे, असेही ते म्हणाले.
शेवगाव येथील ममता लॉन्समध्ये काल झालेल्या तालुका आढावा बैठकीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी बोलताना प्रा. चव्हाण यांनी सांगितले की, यापुढे वंचितांचे प्रश्न आपल्यालाच सोडवायचे आहेत आणि त्यासाठी प्रत्येक गावातून स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फौज उभी केली जाईल.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष योगेश साठे होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहनही प्रा. चव्हाण यांनी केले.
या आढावा बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष कल्याण राव भागवत, शाहूराव खंडागळे, अरुण झांबरे, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष पप्पूशेठ बोर्डे, ओमप्रकाश ससाणे, रवींद्र निळ, अरुण खर्चन, सुंदर आल्हाट, देवदान कांबळे, दादासाहेब गाडे, प्रमोद गजभिव, भारत मिसाळ, विष्णू वाघमारे, अशोक बिडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अनेक तरुण कार्यकर्त्यांनी, तसेच मुस्लिम महिलांनीही पक्षात प्रवेश केला. बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांनी केले, तर आभार युवा अध्यक्ष ऑगस्टीन गजभिव यांनी मानले.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails