नाशिक : वंचित बहुजन आघाडीची जि. नाशिक ता. निफाडची आढावा बैठक पिंपळगाव बसवंत येथील रुचा हॉटेल येथे जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली.
बैठकीत युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दामोदर अण्णा पगारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिला गायकवाड, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, उत्तर महाराष्ट्र नेते पंडित नेटावने, जिल्हा उपाध्यक्ष लीना खरे, भाऊसाहेब अहिरे, प्रशांत अहिरे, जिल्हा संघटक सागर रिपोर्टे, दीपक भंडारी, सचिव योगेश वाघमारे, बाळासाहेब जाधव, महिला जिल्हा महासचिव प्रतिभा पानपाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या बैठकीत तालुका कार्यकारणी, युवक तालुका, शहर कार्यकारिण्या गठीत करणे, गटप्रमुख व गणप्रमुख नेमणे, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका ताकदीने लढवणे यावर चर्चा झाली. तसेच शेतकरी व अन्याय-अत्याचारांच्या प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यानंतर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिला गायकवाड, प्रतिभा पानपाटील, विश्वनाथ चावदास भालेराव, नाना पवार, योगेश वाघमारे यांनी तालुक्यातील इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या यशस्वी बैठकीचे आयोजन निफाड तालुका अध्यक्ष रमेश गवळी, जिल्हा उपाध्यक्ष अकिल पटेल, स्वप्निल गांगुर्डे व राहुल गांगुर्डे यांनी केले. बैठकीसाठी निफाड तालुक्यातील शेकडो गावांमधून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.