पुणे : फुरसुंगी नगरपंचायत परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. समाज परिवर्तनाच्या ध्येयाने प्रेरित होत फुरसुंगी आणि परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून नवसंघटनाला नवी ऊर्जा दिली.
या सोहळ्यात प्रदेश युवा सदस्य ॲड. अफरोज मुल्ला, माथाडी पुणे शहर अध्यक्ष विशाल गवळी, पुणे शहर उपाध्यक्ष विशाल कसबे, राजाभाऊ ढाले, सहसचिव जॉर्ज मदनकर, पितांबर धिवार (पुणे शहर माथाडी सरचिटणीस), चंद्रकांत कांबळे, सूरज बापू कांबळे, अरविंद कांबळे, अनिकेत भालेराव यांसह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोथरूड पोलीस प्रकरण : वंचित बहुजन आघाडीच्या याचिकेवर ११ नोव्हेंबरला सुनावणी
कार्यक्रमादरम्यान नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वावर व धोरणांवर विश्वास व्यक्त करत समाजातील वंचित घटकांच्या हक्कासाठी लढा देण्याचा आणि संघटनेच्या बळकटीसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

प्रदेश युवा सदस्य ॲड. अफरोज मुल्ला यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी ही केवळ राजकीय संघटना नसून सामाजिक क्रांतीची प्रेरणा आहे. आज युवक मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी होत आहेत, ही सकारात्मक आणि परिवर्तनकारी दिशा आहे.”
या प्रवेश सोहळ्यामुळे फुरसुंगी नगरपंचायत परिसरात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि जोश निर्माण झाला असून येत्या काळात आघाडी या भागात आपली भक्कम छाप सोडेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.






