Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

वंचितचा जलवा! प्रस्थापितांना दणका; राज्यातील 3 महापालिकेत निळं वादळ

mosami kewat by mosami kewat
January 17, 2026
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचितचा जलवा! प्रस्थापितांना दणका; राज्यातील 3 महापालिकेत निळं वादळ
       

मुंबई : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरू झाली. सत्तधारी भाजप आणि शिवसेनेनं अनेक महापालिकांमध्ये आघाडी घेतली आहे. 

काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवारही विजयी झाले आहे. पण, दुसरीकडे प्रस्थापितांना धक्का देत वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर  महापालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचं निळं वादळं आलं आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचं होमग्राऊंड असलेल्या अकोला महापालिकेमध्ये वंचित आघाडीने विजयी सुरुवात केली आहे. अकोला महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीचे पॅनल विजयी झाले आहे. जयश्रीताई महेंद्र बहादूरकर,  पराग रामकृष्ण गवई आणि शेख समशू कमर शेख साबीर हे पॅनल विजयी झालं आहे. तर अकोला महानगरपालिका निवडणुकीत 1600 मतांनी नीलेश देव यांचा विजय झाला आहे.

अकोला पालिकेतील विजयी उमेदवार

1) उज्वलाताई प्रवीण पातोडे

2 जयश्रीताई महेंद्र बहादूरकर

3)पराग रामकृष्ण गवई

4) शेख समशू कमर शेख साबीर

५) नीलेश देव

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये एकीकडे भाजपने आघाडी घेतली आहे.  तर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढत ४ जागा जिंकल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक : प्रभाग ३ मध्ये ४ विजयी उमेदवारांची घोषणा 

१) अमित सुधाकर भूईगळ, प्रभाग 3 अ

२) मो. जरीना मो. जावेद म जावेद, प्रभाग ब

३) करुणा मेघानंद जाधव, प्रभाग 3 क

४) अफसर खान यासीन खान, प्रभाग 3 ड

तर, काँग्रेस गट आणि देशमुख कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 5 पैकी 4 उमेदवार विजयी झाले आहे. लातूरमध्ये बहुजन मतांची संख्या ही जवळपास १२ टक्के आहे. पण, वंचितच्या छताखाली मतदार एक झाले आणि पाच पैकी ४ ही उमेदवारांना विजयी मतदान केलं आहे. लातूरमधला वंचित बहुजन आघाडीचा विजय हा सगळ्या मोठा मानला जात आहे.


       
Tags: MaharashtrapoliticsPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadivbaforindiaWinner
Previous Post

लातूर महानगरपालिकेत ‘वंचित’ची धडाकेबाज एन्ट्री; ५ पैकी ४ जागा जिंकत प्रस्थापितांना दिला धोबीपछाड!

Next Post

प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘गुलाल’ उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

Next Post
प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘गुलाल’ उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

प्रभाग क्रमांक ३ मध्ये 'गुलाल' उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू
Uncategorized

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू

by mosami kewat
April 10, 2026
0

अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राष्ट्रपतींकडे तडकाफडकी राजीनामा सोपवला आहे. त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर...

Read moreDetails
राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

April 10, 2026
आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

April 9, 2026
क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

April 9, 2026
राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

April 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home