Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

mosami kewat by mosami kewat
April 10, 2026
in article
0
राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी
       
श्रीरामपूर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक रणधुमाळीची तयारी वेगाने सुरू केली असून, संघटन आणि प्रचारयंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांकडूनही सक्रिय पुढाकार घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉ. गौतम विक्रम चित्ते यांनी राहुरी मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार संतोष चोळके यांच्या प्रचारासाठी पक्षनिधी म्हणून ₹२५,००० रुपयांची देणगी दिली.

हा निधी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमामुळे वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत अत्यंत गंभीरतेने उतरल्याचे स्पष्ट होत असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ही निवडणूक केवळ उमेदवारीची नसून विचारांची, स्वाभिमानाची आणि पर्यायी राजकारण उभे करण्याची लढाई आहे.

डॉ. गौतम चित्ते यांनी दिलेला निधी हा केवळ आर्थिक मदत नसून, वंचितच्या लढ्यावरील निष्ठा, बांधिलकी आणि जिद्दीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुरी विधानसभा मतदारसंघात संतोष चोळके यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते गावोगावी सक्रिय झाले असून, संघटन बळकट करण्यावर भर दिला जात आहे. सामान्य जनतेचा आवाज विधानसभेत पोहोचवण्याचा निर्धार यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित करण्यात आला.

या प्रसंगी प्रदेश महासचिव किसन चव्हाण, प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव, राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, राज्य प्रवक्त्या उत्कृषा रूपवते, जिल्हा महासचिव मधुकर साळवे, जिल्हा युवा महासचिव सुनील वाघमारे, राहता युवा अध्यक्ष विलास अहिरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचा प्रचार अधिक आक्रमक आणि व्यापक पद्धतीने राबवला जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Tags: ElectionMaharashtrapoliticsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

Next Post

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू

Next Post
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन
बातमी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

by mosami kewat
August 30, 2026
0

जालना : परमेश्वर हिवाळे यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली २३ मे २०२६ रोजी कैन्हानगर, जालना येथे अमानुषपणे शेण चारून,...

Read moreDetails
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

August 30, 2026
धोरणात्मक दिवाळखोरी!

धोरणात्मक दिवाळखोरी!

August 30, 2026
प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

August 30, 2026
झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home