Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

mosami kewat by mosami kewat
April 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
       

राहुरी : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ही लढत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यातच होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा केवळ डमी आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी निवडणुकीत नवे समीकरण मांडले.

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुढे बोलताना शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. “ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच प्राजक्ता तनपुरे यांना उमेदवारी दिली नाही. भाजपने दबाव आणला, हा फक्त दिशाभूल करणारा प्रचार आहे,” असे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाचा उल्लेख केला. “या प्रकरणात साधी एफआयआरही दाखल झाली नाही, यात काहीतरी काळेबेरे आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला. (Rahuri Election 2026)

घराणेशाहीवर प्रहार करत ॲड.  प्रकाश आंबेडकर म्हणाले, “घराणेशाही वाढली तर लोकशाही कमकुवत होते आणि हुकूमशाहीला खतपाणी मिळते.” त्यांनी मतदारांना सजग राहण्याचे आवाहन केले. तसेच मुस्लिम समाजाला १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन करत निवडणुकीत मोठा बदल घडवण्याचा इशारा दिला.

अशोक खरात प्रकरणावर बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले. “भोंदूगिरी आणि पारंपरिक व्यवसाय यात स्पष्ट फरक आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी ठणकावले. तसेच “अशोक खरात नेमका कुणाचा नातेवाईक आहे, हे विखे पाटलांनी जाहीर करावे,” असे आव्हान देत त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. (Rahuri Election 2026)

दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच असून, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यात थेट संघर्षाचे चित्र स्पष्ट होत आहे. आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.


       
Tags: BaramatiElectionMaharashtraPoliticalRahuri election 2026Vanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

Next Post

क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

Next Post
क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन
बातमी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

by mosami kewat
August 30, 2026
0

जालना : परमेश्वर हिवाळे यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली २३ मे २०२६ रोजी कैन्हानगर, जालना येथे अमानुषपणे शेण चारून,...

Read moreDetails
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

August 30, 2026
धोरणात्मक दिवाळखोरी!

धोरणात्मक दिवाळखोरी!

August 30, 2026
प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

August 30, 2026
झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home