भिवंडी : वंचित बहुजन आघाडीच्या भिवंडी शहर शाखेने कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा समन्वयक महेश भारतीय यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शिबिरात महेश भारतीय यांनी कार्यकर्त्यांना संघटनेची विचारधारा, ध्येय आणि आगामी काळातील वाटचालीबद्दल सखोल माहिती दिली. यासोबतच, सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्राचे प्रवक्ते रुपेश हुंबरे, प्रतीक साबळे, रवींद्र संगारे आणि सम्यक विद्यार्थी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अनिकेत मोरे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
तसेच शिबिरात भिवंडीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यात ठाणे जिल्ह्याचे माजी समन्वयक अंकुश बचुटे, उपाध्यक्ष भाईदास जाधव, प्रल्हाद गायकवाड यांच्यासह भिवंडी शहर समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांना संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून, आगामी काळात संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.