Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचितांना सत्तेत पोहोचवणे हीच काळाची गरज! उजनीत वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा; सुजात आंबेडकरांचे जोरदार आवाहन

mosami kewat by mosami kewat
February 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचितांना सत्तेत पोहोचवणे हीच काळाची गरज! उजनीत वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा; सुजात आंबेडकरांचे जोरदार आवाहन
       

उजनी : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उजनी येथे वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, ज्या समाजघटकांना आतापर्यंत प्रस्थापित राजकारण्यांनी सत्तेपासून वंचित ठेवले, त्यांना सत्तेत पोहोचवण्याचे ऐतिहासिक काम बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केले आहे. धनगर, माळी, तेली, साळी, कैकाडी, घिसाडी, बौद्ध, लिंगायत, मुस्लिम आणि आदिवासी अशा सर्व समाजघटकांचे प्रतिनिधी निवडून देणे ही काळाची गरज आहे. (Sujat ambedkar)

निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर स्वतः मैदानात उतरले असून, ते ठिकठिकाणी नागरिकांचे मत जाणून घेत आहेत. जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत, त्यांना विजयी करण्याची जबाबदारी ही केवळ पक्षाची नसून सर्व वंचित समूहांची आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (Sujat ambedkar)

या जाहीर सभेला उजनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंचावर पक्षाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये अविनाश भोसीकर (राज्य कार्यकारिणी सदस्य), संतोष सूर्यवंशी (मराठवाडा महासचिव), अमोल लांडगे (युवा आघाडी राज्य सदस्य व नगरसेवक गटनेता), मंजुषा निंबाळकर (जिल्हाध्यक्ष), सुजाता अजनिकर, आकाश इंगळे, ॲड. निखिल अड्डाणसिंह हे उपस्थित होते. तसेच याव्यतिरिक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व अधिकृत उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमुळे लातूर जिल्ह्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीने जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


       
Tags: ElectionLocal body electionMaharashtraMaharashtra politicsPoliticalpolticsSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शेतकरी हित आणि आरोग्य सुविधा हीच आमची प्राथमिकता; चाकूरमध्ये सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

Next Post

अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

Next Post
अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: 'नवोदय' प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप
बातमी

हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप

by mosami kewat
April 3, 2026
0

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजु कांबळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कळमनुरी येथे धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली...

Read moreDetails
६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी 'वंचित' सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी ‘वंचित’ सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

April 3, 2026
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 3, 2026
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

April 3, 2026
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

April 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home