अमरावती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखण्यासाठी व पुढील वाटचाल निश्चित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण संवाद बैठक अमरावती येथे पार पडली. जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी म्हटलं की, “स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता परिवर्तन हे समाजाच्या सबलीकरणासाठी आवश्यक आहे. कार्यकर्त्यांनी संघटित राहून जनतेच्या प्रश्नांसाठी लढा द्यावा,” असे आवाहन केले.
बैठकीस जिल्हा प्रभारी डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड. वालदेकर मॅडम, अमरावती पूर्व जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, अमरावती पश्चिम जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार, महासचिव अशोकराव नवलकर, साहेबराव वाकपांजर यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांच्या कार्यकारिणी सदस्य व तालुका अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच युवा आघाडीचे पूर्व जिल्हाध्यक्ष प्राजक्ता पिल्लेवान, पश्चिम जिल्हाध्यक्ष अंकुश वाघपांजर व त्यांची संपूर्ण कार्यकारिणीही सक्रिय सहभागाने उपस्थित होती. या संवाद बैठकीतून वंचित बहुजन आघाडीने आगामी निवडणुकांसाठी आपली संघटनशक्ती दाखवून दिली आहे.
वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न
लातूर : वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी, रेणापूरची महत्त्वपूर्ण बैठक तक्षशिला बुद्ध विहार, घनसारगाव येथे पार पडली. या बैठकीत सदस्य...
Read moreDetails