बारामती : वंचित बहुजन आघाडी बारामती शहर कार्यकारिणीच्या पुनर्गठनासाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. पुणे जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तसेच बारामती तालुका व नगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत जिल्हाध्यक्ष राजकुमार यांनी पदाधिकाऱ्यांना बुथ बांधणी मजबूत करण्याचे, पक्ष संघटन वाढविण्याचे आणि आगामी निवडणुकीत बारामती नगरपालिका तसेच पंचायत समिती-जिल्हा परिषदेमध्ये आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आदेश दिले.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष मंगलदास निकाळजे, जिल्हा महासचिव सतीश साळवे, उपाध्यक्ष रणजीत पाडळे, सचिव गोविंद कांबळे, संघटक विश्वनाथ घोडके, सहसंघटक साईनाथ लोंढे, युवक जिल्हा महासचिव प्रतिक चव्हाण, बारामती तालुकाध्यक्ष रामदास जगताप,
महिला तालुका अध्यक्षा सुरेखाताई लोंढे, इंदापूर युवक तालुका अध्यक्ष कीर्तीकुमार वाघमारे, बारामती युवक शहराध्यक्ष अनुप मोरे, दौंड युवक तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.