रेणापूर : लातूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाला यश मिळवून देण्यासाठी आणि संपूर्ण ताकदीने निवडणुका लढवण्यासाठी रेणापूर तालुका आणि शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा विजय खेचून आणण्यासाठी विविध रणनीतींवर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटांमध्ये पक्षाची पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या.
यावेळी तालुक्यातील विविध पंचायत समिती सर्कल प्रमुखांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, रेणापूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये मतदान बूथ बांधणीचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली आणि या कामांची जबाबदारी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन करण्याचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सलीम सय्यद आणि जिल्हा महासचिव ऍड. रोहित सोमवंशी हे उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीचे सूत्रसंचालन रेणापूर तालुकाध्यक्ष आर.के. आचार्य यांनी केले, तर तालुका महासचिव विशाल मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला वंचित बहुजन आघाडी रेणापूर तालुका आणि शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails