नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीच्या दृष्टीने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील सर्व विंगचे जिल्हाध्यक्ष आणि महासचिव यांची एक महत्त्वाची बैठक नागपूर येथील जाटतरोडी कार्यालयात नुकतीच पार पडली.
या बैठकीत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमधील संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. निवडणुकीची रणनीती, उमेदवारांची निवड, आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध योजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम, पूर्व विदर्भ संयोजक विवेक हाडके, भगवान भोंडे, प्रफुल्ल माणके, मुरली मेश्राम आणि बाळूभाऊ टेंभुर्णे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना संघटना मजबूत करण्यासाठी आणि निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
या बैठकीला सहाही जिल्ह्यांमधील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली असल्याचे या बैठकीतून दिसून येते.
एपस्टीन फाईल प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; यवतमाळमध्ये मोदींच्या प्रतिमेची होळी करून निषेध
यवतमाळ : जगभरात खळबळ माजवून देणाऱ्या एपस्टीन फाईल प्रकरणावरून आता भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या प्रकरणात भारतातील...
Read moreDetails






