Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘गाव तिथे शाखा’ अभियान: ५ नवीन शाखांचे फलक अनावरण

mosami kewat by mosami kewat
August 3, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन युवा आघाडीचे 'गाव तिथे शाखा' अभियान: ५ नवीन शाखांचे फलक अनावरण

वंचित बहुजन युवा आघाडीचे 'गाव तिथे शाखा' अभियान: ५ नवीन शाखांचे फलक अनावरण

       

तेल्हारा : वंचित बहुजन युवा आघाडीने तेल्हारा तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ या महत्वाकांक्षी अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा स्थापन करून संघटनेची पायाभरणी केली जात आहे. नुकतेच, या अभियानांतर्गत ५ नवीन शाखांचे नामफलक अनावरण करण्यात आले.
‎
‎२ ऑगस्ट २०२५ रोजी घोडेगाव, पाथर्डी, टाकळी, भांबेरी आणि खेल देशपांडे या गावांमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखांचे नामफलक लावण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या अभियानाला विविध जाती-धर्मातील तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‎
‎या कार्यक्रमापूर्वी तेल्हारा येथील शासकीय विश्रामगृहात एक बैठक झाली. या बैठकीत राजेंद्र पातोडे यांनी, देशात संविधानासोबत चाललेल्या खेळामुळे सर्वसामान्यांचे हक्क हिरावले जात आहेत, अशा परिस्थितीत तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांनी इतिहासातील अनेक क्रांतीची उदाहरणे देत युवकांचे महत्त्व अधोरेखित केले.
‎
‎महासचिव राजकुमार दामोदर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरुणांनी सक्रिय सहभाग घेऊन विजय मिळवण्याचे आवाहन केले.

‎तालुकाध्यक्ष झिया अहमद शाह यांनी सांगितले की, वंचित बहुजन युवा आघाडी नेहमीच नागरिक, शेतकरी आणि निराधार लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवते. ज्या तरुणांना समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी या संघटनेत सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
‎
‎या कार्यक्रमाला वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. ज्यात जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वानखडे, नकुल काटे, सचिन शिराळे, जय तायडे, तालुका अध्यक्ष झिया शाह, महासचिव राजेश दारोकार, संघटक अनंत इंगळे, आणि प्रसिद्धी प्रमुख रोहित हिवराळे आदी उपस्थित होते.


       
Tags: Campaignvbaforindiaतेल्हारा
Previous Post

वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू; जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक

Next Post

पुणे पोलिसांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ; ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

Next Post
पुणे पोलिसांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ; 'ॲट्रॉसिटी'अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

पुणे पोलिसांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ; 'ॲट्रॉसिटी'अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 
बातमी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

by mosami kewat
September 29, 2026
0

- संजीव चांदोरकर  “ तुमच्या दोघांच्या भेटीतून आमच्यासाठी फार काही निष्पन्न झाले नाही तरी तुम्ही ( व्यक्ती म्हणून नाही तर...

Read moreDetails
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home