बीड : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन पूर्ण ताकतीने लढत आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा बीड जिल्हा दौरा सुरू आहे. आंबेजोगाई नगरपरिषद उमेदवार मनिषा अनुरथ हातागळे आणि निजामोद्दीन अहेमद शेख यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली.
या दरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांना रोजगार, स्थानिक सुविधा, आरक्षण प्रश्न या सर्वांसाठी लढत आहे. स्थानिक विकास करण्यासाठी एक संधी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, बीड जिल्हाअध्यक्ष पूर्व शैलेश कांबळे, धारूर बीड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





