परभणी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या अपमानास्पद, द्वेषजनक आणि दिशाभूल करणाऱ्या विधानांबद्दल तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. या आक्षेपार्ह पोस्ट्स करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, जिल्हा परभणीच्या वतीने पोलीस अधीक्षक, परभणी यांच्याकडे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. राष्ट्रीय अध्यक्षांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्या संबंधितांवर भारतीय दंड संहिता (IPC), माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा आणि भारतीय संविधानातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
‘वंचित बहुजन आघाडी’ची नाशिकमध्ये नियोजन आढावा बैठक; ‘प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक काम केल्यास विजय निश्चित’ – चेतन गांगुर्डे
निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते: 
यावेळी निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद कुटे (जिल्हा अध्यक्ष उत्तर), मुदसीर असणार (महानगराध्यक्ष), बाबासाहेब जाधव (विधी सल्लागार), मुजफ्फर खान (जिल्हा महासचिव), गौरव कुमार तारू (जिल्हा सचिव), संदीप खाडे (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख), सिद्धार्थ रायबोले (महानगर अध्यक्ष महासचिव) धम्मपाल सोनटक्के, पंढरी ठेंगे, सुनील सोनवळे. अमोल शिरसामकर, यशवंत सोनवणे, बी आर आव्हाड, अमोल घुगे, अशोक वायबळ, दादाराव गायकवाड, श्रीरंग पंडित, मधुकर बनकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे इतर आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
			

 
							




