हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार औंढा नागनाथ यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे तसेच नदीकाठच्या गावांमधील घरांचे तात्काळ पंचनामे करून, मागील वर्षाच्या तुलनेत कमी करण्यात आलेली अनुदान रक्कम वाढवून शेतकरी व पीडितांना त्वरित खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शामसुंदर ठोंबरे, आनंद ढेंबरे, तालुकाध्यक्ष सुनील मोरे, ॲड. आकाश पंडित, अरविंद मुळे, राजरत्न सुतारे, आशिष खंदारे, मंगेश पाईकराव, गजेंद्र कांबळे, सिद्धार्थ नांगरे, शेख याकूब, दलीत पुंडगे, संदीप भगत, भीमराव इंगोले, अभयराज भगत आदी मान्यवर उपस्थित होते.