लातूर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी लातूर महिला शाखेच्या वतीने निलंगा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाताई सूर्यवंशी, प्रेमनाथ सूर्यवंशी, आदिनाथ सूर्यवंशी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद आणि महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर उपस्थित होत्या.
ढोल-ताशांच्या गजरात शेकडो महिला भगिनींनी रॅली काढली. तसेच निंबाळकर फार्म हाऊस येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींच्या हस्ते ध्वजारोहण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.