Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे स्टेशन परिसरात संविधानाचा जयघोष; वंचित बहुजन आघाडीकडून प्रजासत्ताक दिन साजरा

mosami kewat by mosami kewat
January 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुणे स्टेशन परिसरात संविधानाचा जयघोष; वंचित बहुजन आघाडीकडून प्रजासत्ताक दिन साजरा
       

पुणे : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ (मुंडे) आणि पुणे शहर पोलीस अप्पर आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते. मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

कार्यक्रमात बोलताना समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ (मुंडे) म्हणाल्या की, “सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने सक्रिय सहभाग नोंदवून महत्त्वाची भूमिका बजावावी.”

पुढे पोलीस अप्पर आयुक्त मनोज पाटील यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. संविधानामुळेच आपल्याला सन्मानाचे जीवन मिळाले आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले सदैव प्रेरणास्थान राहतील.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. तसेच, सामाजिक न्याय विभागाने वंचित घटकांसाठीच्या योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग, विशाल गवळी, ऋषिकेश नांगरे पाटील, शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, शहर उपाध्यक्ष जॉर्ज मदनकर, राजा ढाले, पंचशील चौरे यांच्यासह आरती सिंग, कल्याणी शेलार, निवास दासारी, हरि वाघमारे, अकबर सय्यद राजे आणि अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. पी. सावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश रणवरे यांनी मानले.


       
Tags: ConstitutionDr Babasaheb AmbedkarequalityFridomMaharashtrapunePune StationRepublic day २०२६Vanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी

Next Post

मंत्रीच प्रोटोकॉल तोडत असतील, तर…

Next Post
मंत्रीच प्रोटोकॉल तोडत असतील, तर…

मंत्रीच प्रोटोकॉल तोडत असतील, तर...

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : आकड्यांमागील आर्थिक राजकारण
article

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : आकड्यांमागील आर्थिक राजकारण

by mosami kewat
March 9, 2026
0

- संजीव चांदोरकर महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: एक निमित्त, राजकीय अर्थव्यवस्थेची बुद्धी भ्रमित करणारी फ्रेम उघडी पाडण्यासाठी ! येणाऱ्या वित्त वर्षात...

Read moreDetails
आदिवासी भागातील संघर्षाला यशाची जोड; हेमकृष्ण पिसदे यांचा UPSC मध्ये झेंडा!

आदिवासी भागातील संघर्षाला यशाची जोड; हेमकृष्ण पिसदे यांचा UPSC मध्ये झेंडा!

March 9, 2026
आई-बहिणीवरून शिवी दिली तर ५०० रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!

आई-बहिणीवरून शिवी दिली तर ५०० रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!

March 9, 2026
इराण–इस्रायल संघर्षाची झळ भारतात; एलपीजी वापरावर प्राधान्य, काही गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद

इराण–इस्रायल संघर्षाची झळ भारतात; एलपीजी वापरावर प्राधान्य, काही गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद

March 9, 2026
विजेता भारत! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाचा टी-२० विश्वचषकावर कब्जा

विजेता भारत! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाचा टी-२० विश्वचषकावर कब्जा

March 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home