Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी

mosami kewat by mosami kewat
January 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी
       

औरंगाबाद : भारतीय लोकशाहीचा उत्सव असलेल्या प्रजासत्ताक दिनी आज औरंगाबादमध्ये एका धक्कादायक आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देऊन  निषेध नोंदवला.

नेमकी घटना काय?

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा दिवस सकाळपासूनच तणावपूर्ण राहिला. प्रभाग २४ मध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचे आणि पैशांचे वाटप करून निवडणुका ‘मॅनेज’ केल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हणले आहे. या गैरप्रकार करणाऱ्या भाजप आमदार नारायण कुचे यांच्या प्रति नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. (Vanchit bahujan aghadi)

आंदोलकांनी ईव्हीएम मशिनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकशाहीची हत्या होत असल्याची घोषणाबाजी केली. तसेच

भाजप आमदारांनी पैशांच्या जोरावर निवडणूक यंत्रणा आणि निकाल प्रभावित केल्याचा  ‘वंचित’कडून सांगण्यात आले. यावेळी संतप्त 

नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून “पैशांच्या जोरावर लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींचा धिक्कार असो” अशा घोषणा देण्यात आले. औरंगाबाद येथे नागरिकांनी नारायण कुचे यांच्या पुतळ्याला भरचौकात फाशी दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत निवडणुका पारदर्शक पद्धतीने होत नाहीत आणि बोगस मतदानाची चौकशी होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. (Vanchit bahujan aghadi)

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती. यामध्ये पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याबाबत चर्चा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आला होता. ऑडिओमध्ये समोरची व्यक्ती आमदारांना सल्ला देताना म्हणते, “आता नको, थोडा अंधार पडू द्या, मग पैसे वाटप करू.”धक्कादायक बाब म्हणजे, “पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो,” असे उत्तर समोरच्या व्यक्तीने कुचेंना दिल्याचे या क्लिपमध्ये रेकॉर्ड झाले आहे.


       
Tags: aurangabadAurangabad newsElectionElection newsEVMMaharashtraNarayan kuchePoliticalpolticsVanchit Bahujan Aghadi
Previous Post

गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान

Next Post

पुणे स्टेशन परिसरात संविधानाचा जयघोष; वंचित बहुजन आघाडीकडून प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post
पुणे स्टेशन परिसरात संविधानाचा जयघोष; वंचित बहुजन आघाडीकडून प्रजासत्ताक दिन साजरा

पुणे स्टेशन परिसरात संविधानाचा जयघोष; वंचित बहुजन आघाडीकडून प्रजासत्ताक दिन साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!
बातमी

अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

by mosami kewat
November 12, 2026
0

राजेंद्र पातोडे यांची टीका; बदर समितीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी मुंबई : महाराष्ट्रातील ५९ अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी...

Read moreDetails
आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

November 12, 2026
दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

November 10, 2026
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

November 8, 2026
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

November 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home