Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न

mosami kewat by mosami kewat
April 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न
       
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संविधानवादी, मानवतावादी, फुले-शाहू-आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी तळागाळात विचार पोहोचवण्याच्या उद्देशाने या शाखेची स्थापना करण्यात आली. सर्व समाजाला बरोबरीने सोबत घेऊन आदर्श समाज निर्मितीसाठी वंचित बहुजन आघाडी कार्यरत असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती मिरवणुकीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक प्रकाश खांडेकर, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, युवक तालुका अध्यक्ष संदीप बाळ, यशवंत शेठ इंगळे, तालुका प्रसिद्धी प्रमुख संदीप गजदाने, शहर प्रसिद्धी प्रमुख शाहिद शेख, तालुका उपाध्यक्ष माणिक गायकवाड, युवा नेते विक्रांत गायकवाड, पोलीस पाटील तसेच माजी सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखाध्यक्ष भीम गायकवाड, सचिव स्वामीनाथ बनसोडे, उपाध्यक्ष गायकवाड, खजिनदार उमेश बनसोडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बनजगोळ येथील या शाखा उद्घाटनामुळे अक्कलकोट तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होण्यास बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: akkalkotMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadivbafotindia
Previous Post

नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

Next Post

अहमदनगर पोलीस प्रशासनाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; ११ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home