पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित जनता दरबार नुकताच पार पडला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल अण्णा जाधव यांच्या हस्ते या जनता दरबाराचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे शहर अध्यक्ष ऍड. अरविंद तायडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या जनता दरबारामध्ये श्रीकांत कुलकर्णी, समाधान माळी, नितीन राठोड, खुशी अमोलिक, मिलिंद ओहोळ, राजेंद्र चव्हाण, रंजिता चव्हाण, चंद्रू मोहिनानी, सोपान कांबळे, सुनील कदम, ललिता बांगर, संपतराव धेंडे, श्रीनिवास दासरी यांसह एकूण १९ पीडित नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी सहभाग घेतला.
या दरबारात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी अकोला जिल्हा परिषद सदस्य मा. संजय बावणे, संतोष इंगळे, नितेश इंगळे, महासचिव विश्वास गदादे, उपाध्यक्ष जॉर्ज मदनकर, सचिव प्रा. बी. पी. सावळे, संघटक सतीश रणवरे, सतीश साबळे (कोथरूड), अध्यक्ष दीपक कांबळे, महासचिव अमोल जगताप, अरविंद कांबळे, योगेश राजापूरकर, पर्यावरण तज्ज्ञ राकेश धोत्रे, मोहन कदम, मोहन गाडेकर, कुणाल कांबळे, धुरंधर भालशंकर यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा आहे
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात "जातीय...
Read moreDetails