मुंबई : वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस सोबत युती करायला तयार नाही अशी पोस्ट सामाजमाध्यमांवर कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने केली होती. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की,काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य कुलदीपसिंह यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी संवाद साधला, संपर्क साधला त्यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला लवकरच दिल्लीतून तुम्हाला संदेश येईल असं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे आमचे युतीमधील पार्टनर शिवसेना( उ बा ठा) या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की, आम्हाला इंडिया आघाडीचा घटक व्हायचं आहे, महाविकास आघाडीचा घटक व्हायच आहे. त्यावेळी आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आल की, या युतीमध्ये कुठल्याही पक्षाला घेण्याचा किंवा न घेण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त कॉंग्रेसचा आहे त्यामुळे कॉंग्रेसच ती प्रक्रिया राबवू शकते. कॉंग्रेसशी थेट बोला. या गोष्टीचा उल्लेख खर्गेजींना पाठवलेल्या पत्रात आम्ही केला आहे. मात्र पत्र पाठवल्या गेलं व अशोक चव्हाण आणि कुलदीपसिंह यांच्याशी प्रस्ताव देण्यात आला, शिवसेना ( उ बा ठा ) पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टींना आठवडे उलटले, महिने उलटले. मात्र अद्यापही कॉंग्रेसकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकृत संवाद नाही, कुठलाही संदेश नाही, कुठलाही निरोप नाही. मग याचा काय अर्थ आम्ही घ्यायचा ? यातून एकच अर्थ निघतो की, वंचित बहुजन आघाडीला कॉंग्रेससोबत युती करायची नाही असा खोडसाळ प्रचार केला जातो यात काहीही तथ्य नाही. उलट वस्तुस्थिती ही आहे की, कॉंग्रेसलाच वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायची नाही.
त्यामुळ कॉंग्रेस सातत्याने कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून कॉंग्रेसमध्ये ज्या नेत्यांना कवडीची किंमत नाही अशा नेत्यांचे काहीतरी मुर्खांसारखे स्टेटमेंट द्यायला लावत आहे. या सगळ्या गोष्टींवरून कॉंग्रेस अडथळा निर्माण करतंय मात्र मूळ मुद्द्यावर कॉंग्रेस बोलायला तयार नाही. आपण जर बघितलं तर नितीशकुमार यांनी भाजपाला हरवण्यासाठी इंडिया आघाडीची सुरुवात केली. कॉंग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व स्वतःकडे घेतलं. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी ते राजीखुशी मान्य केल मात्र कॉंग्रेस काय करत्य की, चार राज्यांमध्ये निवडणुका लागल्या असताना कॉंग्रेसने पुन्हा एकदा घुमजाव केले आहे, पुन्हा भूमिका बदलली आहे. आता चर्चा अशी सुरु करून दिलीय की, इंडिया आघाडी केवळ लोकसभेसाठी आहे, विद्धन सभेसाठी नाही. त्यामुळ इंडिया आघाडीतील कुठल्याही पक्षाला कॉंग्रेस जागा सोडायला तयार नाही. युतीमध्ये घ्यायला तयार नाही. त्या कुठल्याही पक्षांनी दहापेक्षा जास्त जागा महीतल्या नव्हत्या दहापेक्षा कमी मागितल्या होत्या. तरीसुद्धा कॉंग्रेस त्या द्यायला तयार नाही. इतकचं नव्हे तर त्या पक्षाच्या जिंकता येणाऱ्या जागा सुद्धा वाटप करायला कॉंग्रेस तयार नाही. परिणाम काय झालाय आपण बातम्यांमध्ये पाहू शकतो. समाजवादी पक्ष असेल ,जनता दल असेल, सीपीआय , सीपीएम सारखे डावे पक्ष असतील हे आता कॉंग्रेससोबत युतीमध्ये नाहीत. हे सगळे स्वतंत्र लढणार आहेत आणि यांना भाजपला हरवायचं आहे. तर कसं हरवणार आहे कॉंग्रेस ? जर सोबत असलेल्या सहकारी पक्षाला तुम्ही या पद्धतीची वागणूक देत असा विश्वासघात करत असाल तर कसं तुम्ही भाजपला हरवणार? तर या सगळ्या प्रक्रीयेमागे कॉंग्रेसचा नेमका काय मोठा डाव आहे, तो शोधला पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे जे चपराशी इतर पक्षाची बदनामी करतात विशेषतः वंचित बहुजन आघाडीबद्दल खोटे मेसेज वायरल करतात, खोटे आरोप वंचितवर करतात त्यांनी हे लक्षात ठेवाव की, प्रत्येक वेळेला तुमचा खोडसाळ आणि खोटा प्रचार दुसऱ्या पक्षाच नुकसान करेल असं नाही तर कधी तरी तुमचाही भांडाफोड होतो, तुमचाही खरा चेहरा लोकांसमोर येतो जो आता आलेला आहे. त्यामुळ कॉंग्रेसच्या चपारासिंनी स्वतःच्या पक्षाच्या प्रतिमेचा आणि स्वतःचा विचार करावा. वंचितवर टीका करण्यापेक्षा स्वपक्षाची प्रतिमा उजळवण्यासाठी काय करता येईल ते बघा. तुमच्याकडे बघून हिंदीतील दोन म्हनींची आठवण येते. एक म्हणजे, कही पें निगाहें और कही पें निशाना | आणि दुसरी , मुह में राम और बगल में छुरी |अशी तर आपल्या पक्षाची गत झाली नाही न हे जरा आत्मचिंतन करून त्याचा शोध घ्या. असेही मोकळे यांनी म्हटले आहे.