अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत म्हटले होते की, जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांनाच तुमच्या पाठीशी कोण आहे ? ते सांगा
म्हणत प्रती सवाल केला आहे.
आंबेडकरांनी मराठा आणि ओबीसीमध्ये निर्माण झालेल्या वादावरही भाष्य केलं. कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य आहे. अशी परिस्थिती असताना दोन समाजांत दंगली लावण्याच काम सुरु आहे. घटनेच्या चौकटीमध्ये राहून मराठा समाजाला आरक्षण देता येईल. असेही यावेळी ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले
मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते, तेव्हा त्यांच्या तोंडावर सांगून आलो होती की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. असल्या प्रकारचं आरक्षण मिळत नसतं. निवडणुकीच्या तोंडावरच असे मुद्दे कसे समोर येतात. त्यांच्या पाठिशी कोण आहे हे पाहावं लागेल. त्यांचा बोलवता धनी कोण? हे काही दिवसांत समोर येईल, असं राज ठाकरे म्हणाले होते.