बीड : जमिनीवर ताबा घेण्याच्या उद्देशाने एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाळुंज ( ता. आष्टी ) येथे घडली होती.,या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या दबावाने विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघांविरुद्ध विनयभंग, अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
याच पार्श्वभूमीवर आज महिलेच्या वाळुंज येथील घरी जाऊन ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये पीडित आदिवासी महिलेच्या घरी जाऊन साडी चोळी आणि दिवाळीचे फराळ देवून पीडित महिलेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रा.किसन चव्हाण ,राज्य उपाध्यक्ष प्रा विष्णू जाधव,बीड जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष ऍड आणिताताई चक्रे,ऍड दिपक श्यामदिरे, शिरूर तालुका अध्यक्ष दिलीप माने,पाटोदा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेललाभाई शेख व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.