तेल्हारातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी वंचित कडून निदर्शने व धरणे आंदोलन सुरू
अकोला : सन 2022 मध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचे दिलेले अनुदानाचे पैसे तीन दिवसात वापस जमा करा अशा नोटीस तहसील कार्यालयामार्फत तेल्हारा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. या नोटीस मागे घ्याव्यात यासाठी वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन केले आहे.
2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले पिकाचे नुकसानाची सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी मदत असून झालेले नुकसान प्रचंड प्रमाणात आहे. 2022 मध्ये दिलेली तुटपुंजी मदत 2025 मध्ये तीन दिवसाच्या आत सरकारकडे जमा करण्याच्या नोटीस दिल्याने शेतकरी प्रचंड मानसिक दबावाखाली आला आहे. एकीकडे पिकाला भाव नसून उत्पन्न ही निसर्गाच्या कोपामुळे नाही आहे शासनाने दिलेली आर्थिक मदत तीन दिवसात जमा करण्याच्या नोटीसांमुळे शेतकरी प्रचंड दबावात असून यामुळे शेतकरी आत्महत्या सारखे प्रकार होऊ शकतात असे वंचित बहुजन आघाडी, अकोला यांनी म्हटले आहे.
यामुळे दिलेल्या नोटीस त्वरित वापस घ्याव्या ही मागणी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलन करत केली. तसेच तेल्हारा तालुक्यातील पडीत गायरान जमिनीवर अनेक भूमिहीन शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून प्रचंड मेहनत करून शेती तयार करून उदरनिर्वाह करणे एवढे पीक गायरान जमिनीवरून काढत असून, आपला उदरनिर्वाह करत आहेत. गावालगतच्या सरकारी जमिनीवर अनेक बेघर गरीब कुटुंबांनी राहायला आसरा घेऊन त्यावर राहत आहेत या गायरान व गावालगतच्या सरकारी जमिनीवर जाणीवपूर्वक सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे अनेक कुटुंब हवालदिन झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शासनाला गायरान जमिनीवरील व गावालगतच्या सरकारी जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावे, ही मागणी धरणे आंदोलनातून करण्यात आली आहे.
वरील दोन्ही मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्या अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा ईशारा आंदोलनातून देण्यात आला आहे