Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे पोलिसांच्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित आक्रमक; अंजलीताई आणि सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन‎‎‎

mosami kewat by mosami kewat
August 3, 2025
in बातमी, सामाजिक
0
पुणे पोलिसांच्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित आक्रमक; अंजलीताई आणि सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन‎‎‎
       
पुणे : कोथरूड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन मारहाण केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज पुणे पोलिस आयुक्तालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांनी स्वतः आयुक्तालयात जाऊन दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

‎‎पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ, अश्लील भाषा वापरली आणि मारहाणही केली, असा दावा पीडित तरुणींनी केला आहे. या गंभीर प्रकारानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.‎‎वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन‎‎पोलिसांकडून गुन्हा नोंदवला जात नसल्यामुळे, पीडित महिला व तरुणींसह वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहरातील पदाधिकारी सकाळपासून पोलिस आयुक्तालयाबाहेर ठिय्या मांडून बसले होते.

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी तातडीने पुणे गाठले. ‎‎त्यांनी थेट पोलिस आयुक्तालयात जाऊन पीडित तरुणींशी संवाद साधला आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली.

यावेळी, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आयुक्तालयाबाहेर निदर्शने केली. जोपर्यंत दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Tags: Anjali AmbedkarcrimeJusticepolicepune
Previous Post

न्यायाची ऐशी की तैशी !

Next Post

प्रयागराजमधील पुराचं भयाण वास्तव: एका पित्याचा आपल्या मुलाला वाचवण्याचा संघर्ष

Next Post
प्रयागराजमधील पुराचं भयाण वास्तव: एका पित्याचा आपल्या मुलाला वाचवण्याचा संघर्ष

प्रयागराजमधील पुराचं भयाण वास्तव: एका पित्याचा आपल्या मुलाला वाचवण्याचा संघर्ष

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू
Uncategorized

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू

by mosami kewat
April 10, 2026
0

अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राष्ट्रपतींकडे तडकाफडकी राजीनामा सोपवला आहे. त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर...

Read moreDetails
राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

April 10, 2026
आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

April 9, 2026
क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

April 9, 2026
राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

April 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home