स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व शक्तीनिशी लढणार – ॲड. प्रणित डिकले
उस्मानाबाद : वंचित बहुजन आघाडी कळंब व उस्मानाबाद तालुक्याची पक्ष संघटन आढावा बैठक आज उत्साहात संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष ॲड. प्रणित डिकले व जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी, पक्षाची ताकद व धोरणात्मक आढावा घेण्यात आला.
उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला.
या बैठकीसाठी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधाताई लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष रुस्तमखा पठाण, भाऊसाहेब अनदूरकर, नासिर शेख, जिल्हा प्रवक्ते ॲड. के.टी. गायकवाड, जिवा सेना जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अक्षय बनसोडे, महिला आघाडी जिल्हा महासचिव रुक्मिणी बनसोडे, जिल्हा संघटक मंगल आव्हाड, लक्ष्मी गायकवाड, सुरेखा गंगावणे, लोचना भालेराव यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे उमाजी गायकवाड, अमोल अंकुशराव, आसिफ शेख, हकीम शेख, शिवाजी भोसले उपस्थित होते.
तर कळंब येथील बैठकीसाठी जिल्हा उपाध्यक्ष अरुण गरड, रुस्तमखा पठाण, जिल्हा प्रवक्ते शिवाजी कांबळे, जिल्हा संघटक डॉ. बाळासाहेब चंदनशिवे, सचिव अमोल शेळके, महिला आघाडीच्या संगिता गायकवाड, बि.डी. शिंदे, प्रा. अरविंद खांडके, लक्ष्मण धावारे, मेजर विठ्ठल हजारे, भिकाजी आव्हाड, रसूल खान, सनी मस्के, महादेव पायाळ, उपसरपंच वैजनाथ डोंगरे, परमेश्वर कसबे, सचिन सावंत, रघुभाऊ ओव्हाळ, प्रशांत धावारे, सुधीर वाघमारे, अंकुश वाघमारे, बापूराव जोगदंड, धीरज गायकवाड, धनराज नाईकवाडी, किरण नाईकवाडी, गणेश साखळे, युवा नेते विशाल वाघमारे, मल्हारी गायकवाड, उत्तम सावंत, विकी वाघमारे, प्रतिक्षा सावंत, मंजुताई सावंत, सुदामती गरड आदींसह वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष ॲड. प्रणित डिकले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी “सर्व शक्तीनिशी उतरून प्रभावी लढा देईल” असा ठाम निर्धार व्यक्त केला.