Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’

mosami kewat by mosami kewat
February 6, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले कौतुक ! 

Under 19 World Cup 2026 : भारतीय युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा दाखवून दिले की क्रिकेटच्या दुनियेत ‘किंग’ कोण आहे! आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवत सहाव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने हा ऐतिहासिक विजय साकारला.

वैभवचा ‘सूर्या’ तळपला; भारताचा धावांचा डोंगर

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित षटकात तब्बल 411 धावांचा डोंगर उभारला. या डावाचा खरा हिरो ठरला तो वैभव सूर्यवंशी. वैभवने केवळ 80 चेंडूत 175 धावांची विरारोहक खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 15 चौकार आणि 15 उत्तुंग षटकार खेचले. त्याला आयुष म्हात्रे (53 धावा) आणि अखेरच्या षटकांत कनिष्क चौहानने (20 चेंडूत 70 धावा) दिलेल्या वादळी साथीमुळे भारताला 400 पार मजल मारता आली. (Under 19 World Cup 2026)

412 धावांच्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जोसेफ मूरस अवघ्या 17 धावांवर माघारी परतला. बेन मेयेस (45) आणि थॉमस रिव्ह्यू (31) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत.

सलामीवीर बेन डॉकिन्सने 66 धावांची खेळी करत एक बाजू लावून धरली होती. तर  इंग्लंडकडून सेलेब फॉल्कनरने 115 धावांची झुंजार शतकी खेळी करत भारताच्या गोटात काही काळ भीती निर्माण केली होती. मात्र, तो बाद होताच इंग्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला आणि संपूर्ण संघ 311 धावांवर गुंडाळला. (Under 19 World Cup 2026)

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले कौतुक

भारतीय युवा संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरल्यानंतर जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही या विजयाची दखल घेत खेळाडूंचे अभिनंदन केले. ‘भारतीय संघाने अंडर-१९ विश्वचषकात मिळवलेला हा विजय अत्यंत शानदार आहे,’ अशा शब्दांत त्यांनी टीम इंडियाचे कौतुक केले आहे.


       
Tags: championCriketEnglandHistoricalIndia teamMatchPrakash AmbedkarsportsUnder 19Under 19 World Cup 2026victoryWinner
Previous Post

अभिमानास्पद! भारताच्या मीराबाई चानूची विक्रमी खेळी, एकाच स्पर्धेत मोडले तब्बल तीन राष्ट्रीय विक्रम

Next Post

रमाई जयंती विशेष ! बाबासाहेबांच्या हृदयातील रमाई

Next Post
रमाई जयंती विशेष ! बाबासाहेबांच्या हृदयातील रमाई

रमाई जयंती विशेष ! बाबासाहेबांच्या हृदयातील रमाई

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘ट्रान्सजेंडर संरक्षण सुधारणा विधेयक २०२६’ला वंचित बहुजन आघाडीचा विरोध; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
बातमी

‘ट्रान्सजेंडर संरक्षण सुधारणा विधेयक २०२६’ला वंचित बहुजन आघाडीचा विरोध; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

by mosami kewat
March 19, 2026
0

मुंबई: 'ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९' मध्ये केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या सुधारणांना वंचित बहुजन आघाडीने (VBA) कडाडून विरोध दर्शवला...

Read moreDetails
वंचित आक्रमक : नांदेडमध्ये आरएसएसप्रणीत संघटनेच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध; पीपल्स कॉलेजमधील कार्यक्रम अखेर रद्द! 

वंचित आक्रमक : नांदेडमध्ये आरएसएसप्रणीत संघटनेच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध; पीपल्स कॉलेजमधील कार्यक्रम अखेर रद्द! 

March 19, 2026
धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस

धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस

March 18, 2026
दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू

March 18, 2026
बँकांचे लाखो कोटी रुपये 'विल्फुल डिफॉल्टर्स'च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

बँकांचे लाखो कोटी रुपये ‘विल्फुल डिफॉल्टर्स’च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

March 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home