Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे

mosami kewat by mosami kewat
April 9, 2026
in बातमी, राजकीय
0
बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे

बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे

बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, पक्षाने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्येही विविध स्तरांवर चर्चा, संवाद आणि विचारमंथन सुरू होते. (Baramati By poll)

Also Read : राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ

अनेक दिवस चाललेल्या अंतर्गत चर्चांनंतर काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय जवळपास निश्चित केल्याचे समजते. पक्षातील काही नेत्यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली होती, तर काहींनी सध्याच्या राजकीय समीकरणांचा विचार करून माघार घेण्याचा पर्याय योग्य असल्याचे मत व्यक्त केले.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेनंतर बारामतीतील निवडणुकीबाबत समन्वय साधण्याचा प्रयत्न झाल्याचेही बोलले जात आहे. (Baramati By poll)

Also Read : खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडीने याआधी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसला समर्थन देण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र काँग्रेसकडून माघारीचा निर्णय घेतला गेला.

Tags: Ajit PawarAlliance PoliticsBaramatiBaramati By pollCongressElectionElection newsindian politicsMaharashtra politicsMahayutiMallikarjun KhargeNCPNCP FactionPoliticalSharad PawarSunetra pawarvba
Previous Post

ट्रम्प यांचा ‘चिकन आऊट’ पॅटर्न: दोन आठवड्यांचा सुस्कारा, पण पुढे काय?

Next Post

पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home