शहीद सोमनाथ सूर्यवंशींना यांना आदरांजली, १२० शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर : पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजाच्या वतीने दृगधामना येथे आभार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद सोमनाथ सूर्यवंशींना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुढील शिक्षणाची प्रेरणा मिळावी या हेतूने वडार समाजातील १२० विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हाध्यक्ष अजय सहारे तर प्रमुख वक्ते म्हणून गोंदिया-भंडारा जिल्हा प्रभारी भगवानजी भोंडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सचिव सोनियाताई वानखेडे, माजी सरपंच रिता उमरेडकर, राणी काटे, अर्जुन बोरकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक नागेश बोरकर यांनी केले तर संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय अतकर, रुचिका अतकर, मारोती इटकर, पिलाजी पवार, मुकुंदा मांजरेकर, रवी मिरेकर, मोहन देवकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या सोहळ्यास बंटी बोरकर, नागनाथ काटे, श्रीकांत रामटेके, विनायक घुमटकर, अभिजित मेश्राम, रमेश गजभिये, सिद्धार्थ मेश्राम, राजेंद्र गजभिये, रईस डोंगरे, वामन वाहने, राहुल लामसोंगे यांच्यासह वडार समाजातील महिला, पुरुष व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.