Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

तरुणांनो चळवळ समजून घेतांना…..

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 29, 2022
in राजकीय
0
तरुणांनो चळवळ समजून घेतांना…..
0
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

फुलांशी खेळण्याच्या वयात मी निखाऱ्यांशी खेळतोय,
मोकळ्या हवेत बागडणाऱ्या वयात मी कारावास भोगतोय !
ज.वी. पवार

नुकत्याच नांदेड शहरात पार पडलेल्या दलित – ब्लॅक पँथर आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्य आकर्षण असलेले दलित पँथरचे सहसंस्थापक ज.वी.पवार हे उपस्थित होते. आजच्या आंबेडकरी आक्रमकतेची ज.वी. पवार हे फार मोठी प्रेरणा आहे. तसेच आंबेडकरी चळवळीत त्यांच्या अनुभवामुळे, अभ्यासामुळे आणि प्रामाणिक वर्तनामुळे त्यांचा थोरा मोठ्यांवर दबदबा आहे. याच परिषदेत भाषणा दरम्यान ज.वी. पवार म्हणाले की, मी आंबेडकरी चळवळीच्या चार पिढ्यांसोबत काम केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथ्या पिढीसोबत काम केले. चळवळीत निष्ठा आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. त्याचाच मागोवा घेत असताना त्यांच्याच ‘नाकेबंदी’ या काव्यसंग्रहातील ओळी त्यांच तारुण्य आणि दरम्यानचा संघर्ष व्यक्त करणाऱ्या वाटतात.

आमच्या काळात चळवळीचे झालेले एव्हेंटीकरण लक्षात घेता, ज.वी. पवारांच्या विद्यार्थी अवस्थेतील चळवळ केव्हाही पुरून उरणारी वाटते. ज.वी. पवारांनी ‘माझी चळवळ’ या आत्मकथनात संदर्भातील भूमिहिनांच्या सत्याग्रहाबाबत अनुभव नमूद केला आहे, यातच सिद्धार्थ नगर येथे सत्याग्रहींचा सत्कार करतेवेळी विद्यार्थी तुकडीचा नेता म्हणून त्यांना भैय्यासाहेब आंबेडकरांसोबत मंचावर बसविण्यात आल्याचे ते नमूद करतात . १९६४ सालापासून वॉर्डाचा सेक्रेटरी ते मुंबई प्रदेशचा अध्यक्ष हा त्यांचा रिपब्लिकन चळवळीचा प्रवास आणि जडण घडण समाज व्यवस्थेतला हादरे देणारा ठरणार होता असा अंदाज कदाचित इतिहासाने तेव्हाच हेरला असेल ! तसेच ज.वी.पवार हे भैय्यासाहेबांचे अखेरचे सहकारी म्हणून राहिले. प्रामाणिक दृष्टिकोनाचे कदाचित ते वर्तमानात एकमेव पुरावे आहेत. दरम्यान काही झाले तरी रिपब्लिकन पक्षाशी असलेली तुझी नाळ तोडू नको हा भैय्यासाहेबांचा आदेश त्यांनी आजतागायत पाळला आहे. आंबेडकरी कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रात्रीतून स्वतः चे झेंडे बदलल्याचा इतिहास असतांना ज.वी पवारांची त्यांच्या बाबासाहेबांप्रती असलेल्या निष्ठेची कोणते प्रेम आम्ही पुढे घेऊन जात आहोत ? याचा मला प्रश्न पडतो.

पुढे दलित पँथर रूपाने आंबेडकरी विचारांनी आक्रमक बनलेली एक संघटना उदयास आली. तिचा गवगवा महाराष्ट्रासह संपूर्ण जगाने केला. या सर्वांच्या प्रक्रियेतील ज.वी.पवार हे नाव असलेला तरुण आजही इतर तरुणांना लाजवेल या दिमाखात भाषण करताना दिसतो. त्यामागे त्यांचा असलेला दांडगा अनुभव आहे. इंदापूर बावड्यातील प्रकरणापासून दलित पँथरच्या फुटी पर्यंतचा प्रवास त्यांच्या स्मरणात आहे. दरम्यान, ‘आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ खंड ४’ च्या प्रास्ताविकेत ते म्हणतात “दलित पँथरचा इतिहास लिहिण्याचा अधिकार फक्त तिघांनाच आहे. राजा ढाले, नामदेव ढसाळ व ज.वी.पवार. हे तीन लोक. या काळात मी दलित पँथरचा संघटक आणि नंतर सरचिटणीस झालो . त्यामुळे सर्व पत्रव्यवहार आणि संघटनेची भूमिका / पत्रके माझ्याच सहीने प्रकाशित होत होती, यामुळे दलित पँथरच्या पिढीच्या काळातील एक नायक किती महत्त्वपूर्ण आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो.

आजच्या घडीला कॉंग्रेससह काही कॉंग्रेसी हरिजन किंवा बुध्दी भेदाने कमकुवत झालेली मस्तके रिपब्लिकन ऐक्य अथवा युत्या आघाड्यांचे गणित मांडताना दिसतात. परंतु, बाळासाहेब आंबेडकरांसोबत असताना ज.वी.पवारांनी ‘भारतीय कॉंग्रेस आणि आंबेडकरी चळवळ’ मध्ये नमूद केलेला १९९९ मध्ये विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ मित्रपक्ष असतानाचा अनुभव ती लोक लक्षात घेत नाही किंवा महाराष्ट्राच्या आंबेडकरी राजकारणाचा एक भव्यदिव्य असलेला पुरावा नाकारतात याचाच खेद वाटतो. याबाबत ज.वी.पवार. आगपछड करतांना म्हणतात की “ज्यांना खुर्ची सत्तास्थाने खूणवित असतील त्यांनी खुशाल कॉंग्रेसवर प्रेम करावे;परंतु आपण आंबेडकरी आहोत असा डंका वाजवू नये” !

आजच्या घडीला बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी राजकारणाला टिकविण्याचा एक पर्याय म्हणून तरुण बघतात‌. आम्ही ही राजकीय सत्तास्थाने बळकावू शकतो ही महत्त्वाकांक्षी वृत्तीचे कारणदेखील बाळासाहेब आहेत. परंतु, ज.वी. पवारांच्या दूरदृष्टीचा निष्ठेचा आणि स्वाभिमानाचा केंद्र हा बाळासाहेबांसोबतच असल्याचे दिसते. त्या नावामागील आंबेडकर नावावरील शक्तीपेक्षा प्रेमापेक्षा त्यांनी जाणलेलं बहुजनांच हितं आंबेडकरी चळवळीप्रति असलेला अभ्यास आणि बाबासाहेबांप्रति असलेलं वेड आहे.

ज.वी. पवारांनी जशी सामाजिक आणि राजकीय चळवळ चार पिढ्या बघितल्या, तसेच त्यांनी साहित्य संशोधन क्षेत्रात ही मुख्य जबाबदारी पार पाडली आहे. यात कादंबरी, काव्यसंग्रह, चिंतनात्मक, राजकीय आणि संशोधनपर अनेक पुस्तके आहेत. आंबेडकरी चळवळीच्या डॉक्युमेंटेन्शनमध्ये त्यांचा तर सिंहांचा वाटा आहे. बाबासाहेब आणि रमाई यांच्या लग्न तारखेचा शोध हा आंबेडकरी चळवळीसाठी फार मौल्यवान असलेला शोध ही ज.वी.पवार यांचाच आहे. तसेच मराठीतल्या महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, पुढारी, पुण्य नगरी आदी अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले असून, साधारणतः हा लेखांचा आकडा पाच हजारांच्या आसपास आहे. या बाबत स्वतः ज.वी.पवार म्हणतात की, “मी आंबेडकर भक्त असल्याचा माझ्यावर आरोप केला जातो आणि त्यापोटीच त्यांच्या नावाने मी लेखनास सुरुवात केली, असे असले तरी एकाच माणसाच्या नावाचा उल्लेख करून चाळीस वर्षे लिखाण करण्याचा जागतिक विक्रम मी केला आहे”.

एकंदरीत ज.वी.पवार हे सध्या हयात असलेले एकमेव पॅंथर आहे ज्यांच्या अनेक पैलूंनी इतिहासाला आवाहन दिले ! आंबेडकरी चळवळीला नवदिशा दिली. त्यांच्या चार पिढ्यांच्या अनुभवाची शिदोरी आपल्याला प्रेरणा आणि दिशा देणारी आहे. आजही महाराष्ट्राभर फिरून ते बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची भूमिका पोहचवितांना दिसतात. पुढील काळ अत्यंत कठीण आणि संघर्षाचा आहे. यात आपली निष्ठा आणि प्रामाणिकपणा यासोबत कुठेही तडजोड न करता लढण्याची उर्मी तेवत ठेवण्याचा झरा म्हणून आपण त्याकडे पाहिले पाहिजे. त्याप्रति कृतज्ञता बाळगून आपण चळवळीची आगेकूच करण्याची गरज आहे!

संविधान गांगुर्डे


       
Tags: Ambedkarite movementJ V PawarPanthersRepublicanज वी पवार
Previous Post

महिला आरक्षणाच्या निमित्ताने…!

Next Post

प्रस्थापित, पत्रकार, पुरोगामी आणि त्यांच्या गुलामांचा दुटप्पीपणा !

Next Post

प्रस्थापित, पत्रकार, पुरोगामी आणि त्यांच्या गुलामांचा दुटप्पीपणा !

वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट नामकरण
बातमी

वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट नामकरण

बार्शिटाकळी - मंगरूळपिर राज्य महामार्गावरील विद्रुपा नदीवर कान्हेरी सरप जवळील आणि शिवम जिनींग फॅक्ट्री जवळील पुलावर मागच्या वर्षीपासून कठडे नाहीत, ...

March 16, 2023
भाजपच्या भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा.
बातमी

भाजपच्या भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा.

३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार अकोला : भाजपचे खासदार, आमदार आणि महापौर ...

March 16, 2023
चातुर्वर्णातील वैदिक आणि तांत्रिक राज्याभिषेक
सामाजिक

चातुर्वर्णातील वैदिक आणि तांत्रिक राज्याभिषेक

पुणे  जिल्ह्यातील जुन्नर  शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्य शासनाने ...

March 13, 2023
जैन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार दाखल
बातमी

जैन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार दाखल

बंगलोर - जैन विद्यापीठ बँगलोर येथे विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात दलित समाजा बद्दल आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, परमपूज्य महामानव डॉ. ...

February 10, 2023
वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत
बातमी

वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

पुणे : वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीची घोषणा होताच पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन ...

January 23, 2023
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क