अकोला, दि. १५ – राज्यातील सरकारने युवा पिढीचे शिक्षण आणि नौक-या ह्यांचे खाजगीकरण करीत एक लाख जागा भरण्यास सुरुवात केली असून ह्या विरोधात आवाज उठविणारे तरुण, पक्ष आणि संघटना ह्यांचे आवाज दाबण्यासाठी सरकारने मोर्चे आणि आंदोलन ह्यावर बंदी घातली असून राज्यात अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे मीडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
राज्यात कंत्राटी नोकर भरती शासन निर्णय काढून सरकारी क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण करण्यात आले आहे.स्पर्धा परीक्षा वाढीव फी लागू करण्यात आली.ह्या परीक्षा लोक सेवा आयोगा मार्फत घेण्यात एवजी परीक्षा आणि भरतीचे अधिकार खाजगी कंपन्यांना दिले आहेत.सोबतच जि.प.शाळा बंद करण्याचा आणि समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय घेवून शिक्षण हक्क नाकारला जात आहे.पेपरफुटी संदर्भात कडक कायदा नसल्याने घोटाळे बाहेर पडत आहेत.शिक्षण हक्क कायद्याची वाट लावली असून आरटीई अंतर्गत शाळांची थकित संपूर्ण रक्कम अदा केली जात नाही.शिवाय प्रलंबीत शिष्यवृत्ती आणि स्वाधारचा निधी दिला जात नाही.शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक, शाळा दत्तक देणे बाबतीत केलेले बेकायदा नियम करण्यात आले आहेत.ह्या मुळे भाजप आणि राज्य सरकारच्या विरोधात सर्व सामान्य नागरिक, विद्यार्थी शिक्षक, पालक आणि व्यापारी, शेतकरी, शेतमजूर,महिला, युवती, कामगार ह्याच्यात तीव्र संतापाची भावना आहे.सरकारच्या नफेखोरी विरोधात आणि युवा पिढीचे भवितव्य उध्वस्त करण्या साठी घेतलेले कंपनी धार्जिणे निर्णय ह्या विरोधात आवाज उठू नये म्हणून राज्यात अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली आहे, असा आरोप राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.विविध जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी ह्यांनी ही अघोषित आंदोलन बंदी साठी आदेश काढले आहेत.अकोला जिल्हाधकारी यांनी देखील आदेश कक्ष २ / गृह / म.स. ३ कावि- १०२०/२०२३ दि.०६/१०/२०२३ अन्वये दि. ११/१०/२०२३ चे ००.०० वाजता पासुन ते दि.२८/१०/२०२३ वे २४.०० वा पावेतो संपूर्ण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी या दृष्टीने कलम ३७ (१) (३) मुपोका प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. सदर आदेशामध्ये नमुद केल्याप्रमाणे धरणे आंदोलने करण्यास व मोर्चा काढण्यास पाच किंवा त्यापेक्षा जास्त इसमांना एकत्रित येण्यास मनाई केलेली आहे.गृह खात्याचे मंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार ऐन सणसुदीच्या दिवसात सरकारने पाच किंवा त्यापेक्षा जास्त इसमांना एकत्रित येण्यास मनाई केली आहे.आजपासून नवरात्र सुरू झाले आहेत, धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असे सार्वजनिक उत्सव साजरा होत असताना जिल्हा आणि पोलीस प्रशासन ह्यांना हाताशी धरून भाजपच्या गृह खात्याने राज्यात हुकूमशाही लागू केली आहे.मात्र जगात आणि देशात झालेल्या क्रांत्या तरुणांनी केल्या असून मोठ मोठे हुकुमशाह मातीत गाडले आहेत, ह्याचे भान सत्ताधारी विसरले असून २०२४ च्या निवडणुकीत ह्याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील असा इशारा देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.