Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ

mosami kewat by mosami kewat
May 6, 2026
in बातमी, राजकीय
0
जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
       

पंजाब : पंजाबमध्ये मंगळवारी रात्री अल्पावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याने राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जालंधर आणि अमृतसर येथे घडलेल्या या घटनांमुळे सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जालंधरमध्ये बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) पंजाब फ्रंटियरच्या मुख्यालयाबाहेर उभी असलेली एक स्कूटर रात्री सुमारे ८.१५ वाजता अचानक स्फोटाने उडाली. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार ही स्कूटर तेथील एका कर्मचाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी सांगितले की, स्कूटरला प्रथम आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाला. हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे झाला की यामागे कोणता घातपात आहे, याचा तपास पोलीस आणि बीएसएफकडून संयुक्तपणे सुरू आहे.

या घटनेनंतर अवघ्या दोन तासांत अमृतसरमधील खासा परिसरात, लष्करी छावणीच्या जवळ, रात्री सुमारे १०.३० वाजता दुसरा स्फोट झाला. हा स्फोटही जोरदार असल्याचे स्थानिकांनी सांगितले असून त्याचा आवाज दीड किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. स्फोटाच्या धक्क्याने आसपासच्या घरांनाही कंप जाणवला. लष्करी परिसर असल्याने तात्काळ जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर बंदोबस्ताखाली घेतला.

दोन्ही घटनांनंतर फॉरेन्सिक पथके तपासासाठी घटनास्थळी पोहोचली असून स्फोटाचे नेमके कारण आणि वापरलेले साहित्य याचा शोध घेतला जात आहे. जालंधर आणि अमृतसरमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. या दोन स्फोटांमध्ये काही संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, संपूर्ण पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


       
Tags: amritsarPanjabVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

Next Post

इराण युद्ध: पडद्यामागचा चीन, आता स्टेज वर!

Next Post
इराण युद्ध: पडद्यामागचा चीन, आता स्टेज वर!

इराण युद्ध: पडद्यामागचा चीन, आता स्टेज वर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन
बातमी

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

by mosami kewat
September 28, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन...

Read moreDetails
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home