Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वादळी वारा आणि जोरदार पावसाने वीस घरे पडली

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 28, 2024
in बातमी
0
वादळी वारा आणि जोरदार पावसाने वीस घरे पडली
       

प्रशासनाने यांची भरपाई करावी – ॲड.डॉ. अरुण जाधव

जामखेड : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे चक्रीवादळ आणि जोरदार पावसामुळे खर्डा शहरालगत कानिफनाथ मंदिराच्या पायथ्याशी मंजूर असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीमधील वीस घरकुलांचे काम चालू असताना ती घरे पडली. या घरांचे काम पत्रा लेवल पर्यंत आले होते.

या घरांचे काम चालू असल्याने तेथील मदारी बांधव हे पालाची झोपडी टाकून तिथे राहत होता. परंतु जोराच्या वाऱ्याने आणि पावसाने त्यांच्या पालाच्या झोपड्या देखील उडून गेल्या आहेत. यामुळे लहान मुले आणि वृद्ध यांची गैरसोय झाली आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आणि भटक्या विमुक्तांचे नेते ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना घेऊन तात्काळ खर्डा येथे चालू असलेले यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीची पाहणी केली. तसेच मदारी बांधवांना धीर दिला. ते म्हणाले की, गेली 50 वर्षापासून भटक्या समाजातील मदारी बांधव खर्डा या ठिकाणी राहतो खूप गरीब व इमानदार समाज आहे. यांना जमीन घरकुल व्यवसाय नाही कला दाखवून शोभेचे वस्तू तयार करून भंगार, काच, पत्रा गोळा करून हा समाज उपजीविका भागवतो.

ॲड. जाधव म्हणाले कि, काल झालेल्या पावसामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत बांधकामाचे पडून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले सात वर्षापासून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी कार्यकर्त्यांना घेऊन संघर्ष करत आलो आहे. अखेर मदारी बांधवांचे स्वप्न होते कि, घरे होतील व घरात जाऊन राहता येईल. मात्र हे स्वप्न अर्धवट राहिले आहे.

दानशूर व्यक्ती, कंपन्या, सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांनी वीट, वाळू, पत्रे, खिडकी, दरवाजे, सिमेंट याची मदत करावी. तसेच जामखेड तालुक्याचे तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, पंचायत समिती, बिडिओ आपण या घटनेची दखल घ्यावी आणि नुकसान भरपाई करावी.असे अहवान ॲड. जाधव यांनी केले आहे.


       
Tags: Arun JadhavKhardaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मांडेगावातील जय भीम बुध्दविहारात बुद्ध जयंती उत्साहात साजरी

Next Post

पुणे अपघाताच्या रात्री पोलिसांना कोणत्या मंत्र्याचा फोन आला होता?

Next Post
पुणे अपघाताच्या रात्री पोलिसांना कोणत्या मंत्र्याचा फोन आला होता?

पुणे अपघाताच्या रात्री पोलिसांना कोणत्या मंत्र्याचा फोन आला होता?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
बातमी

कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

by mosami kewat
April 11, 2026
0

कल्याण : शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, रिपब्लिकन सेनेतील काही सक्रिय कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे....

Read moreDetails
समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

April 11, 2026
सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

April 11, 2026
Sangli : मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ : २९ दिवस तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा संताप उसळला

Sangli : मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ : २९ दिवस तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा संताप उसळला

April 11, 2026
RBI UPI Rules : PhonePe, Google Pay वापरताय? मग हे वाचाच! RBI कडून 'किल स्विच'सह मोठे बदल लागू

RBI UPI Rules : PhonePe, Google Pay वापरताय? मग हे वाचाच! RBI कडून ‘किल स्विच’सह मोठे बदल लागू

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home