वंचित बहुजन आघाडीचा तुषार गांधींवर निशाणा
मुंबई : महात्मा गांधींना वंचित वर्गासाठी (आताच्या अनुसूचित जातीसाठी) स्वतंत्र मतदार नको होते. आता त्यांचे पणतू तुषार गांधी यांनाही वंचित आणि बहुजनांच्या पक्षाने निवडणूक लढवावी आणि त्यांच्या जवळही स्वतंत्र राजकीय विचार आणि नेतृत्व असावे, असे वाटत नसल्याचा थेट हल्ला वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
यामध्ये पुढे म्हटले आहे की, महात्मा गांधींना याचा अभिमान वाटेल की, त्यांचे रक्त त्यांच्या सडलेल्या जातीयवादी विचारसरणीचा वारसा आणि अनुसूचित जातींबद्दलच्या वृत्तीचा वारसा पुढे नेत आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने थेट इतिहासाचा दाखला देत तुषार गांधी यांना प्रतिउत्तर दिले आहे.
आम्ही तुषार गांधी यांचे वंचित बहुजन आघाडीविषयीचे विश्लेषण ऐकलंय. आम्हाला या तथ्याशिवाय दुसरे काही सांगायचे नाही की, त्यांच्यातही त्यांच्या आजोबांसारखा जातीयवाद भिनलेला आहे. तुषार गांधी तुम्हाला लाज वाटू द्या, असे तुषार गांधींना ‘वंचित’ने खडसावले आहे.