सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजेनंतर झालेल्या आश्चर्यकारक 76 लाख मतांच्या वाढीविरोधात, तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या पळवलेल्या निधी विरोधात “जन आक्रोश मोर्चा” सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या आंदोलनात सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अमोल लांडगे यांनी केले आहे. या मोर्चात सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असून, हा मोर्चा लोकशाहीवरील वाढत्या आघातांविरोधात जनतेचा आवाज ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेली मोठी मतदानवाढ, ईव्हीएम व पारदर्शकतेविषयी असलेले प्रश्न आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!
आपल्याला काय फरक पडतो ? जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल असा प्रश्न दीर्घकाळात आत्मघातकी सिद्ध होतो. खरेतर खूप फरक पडतो हे सिद्ध...
Read moreDetails






