इस्रायल – पॅलेस्टाईन संघर्षावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
मुंबई : इस्रायलने सुरू केलेल्या युद्धामुळे विस्थापित झालेल्या लाखो लोकांप्रती मी निर्भिड एकजूट व्यक्त करतो. रफाह, जिथे 6,10,000 हून अधिक मुले आश्रय घेत आहेत, इस्त्रायली सैन्य या ठिकाणी आक्रमण करण्याच्या मार्गावर आहे. हे विश्व याला परवानगी कशी देऊ शकते?आपण याची परवानगी कशी देऊ शकतो? ही वेळ दिल्लीने इस्रायल-पॅलेस्टाईन समतोल राखण्याची नसून, माणुसकी आणि शोषितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, युद्धात विस्थापित झालेल्या लाखो लोकांसोबत आपण अधिकृतपणे एकजूट दाखवली पाहिजे आणि मध्यस्थ म्हणून काम केले पाहिजे. इस्रायली सैन्याने रफाहवर हल्ला करण्यापूर्वी आणि हजारो लोकांना ठार करण्यापूर्वी इस्रायल-हमास यांच्यात शस्त्रसंधी आणि बंधक सोडण्याच्या करारावर वाटाघाटी केल्या पाहिजेत.